छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह' अंतर्गत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रियदर्शिनी मनपा शाळेत आयोजित कार्यक्रमात स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आकर्षक व सुंदर चित्रे रेखाटत आपल्या कल्पकतेची आणि कलागुणांची प्रभावी झलक सादर केली. उपक्रमाचे आयोजन
सभापती अनिल मकरीये यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी नगरसेविका अर्चना निळकंठ, मुख्याध्यापक संजीव सोनार, दीपक मुंडले, महेश साकोलकर तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












